Share

लसीकरणासाठी दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांच्या केंद्र सरकारकडे ‘या’ मागण्या

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व राज्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली यावेळी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.

यामध्ये लस देण्यासाठी दिल्लीला प्राथमिकता देण्यात यावी, ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी आणण्यात यावी, तर कोरोना लस मोफत देण्यात यावी. आदि मागण्यांचा समावेश आहे. तर दिल्ली सोबतच महाराष्ट्राने द्खील यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत.

यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी संगोतल की, आम्ही चार राज्यांत ड्राई रन लसीकरण केलीअसून ग्यातून मिळालेल्या फीडबॅकनुसार मध्ये सुधारणा केली आहे. तर उद्या ३३ राज्यात ही ड्राई रन राबवण्यात येणार आहे.

तर कोविशील्ड आणि कोवैक्सीन या दोन्ही लसी देशात लवकरच उपलब्ध होणार असून लसीकरण सुरु करण्यात येईल. तर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़ या राज्यांत कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणा सोबतच कोरोना चाचण्या देखील करणे तितकेच गरजेचे असल्याच त्यांनी यावेळी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!