🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नंतर आता अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.
जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.
अभिनेता सोनू सूद विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरच भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. कंगना रणौत नंतर सोनू सूद यांच्यावर वेळ आली असून किती जणांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार, असा सवाल राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. राम कदमांनी त्याबाबत ट्विट केले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी यापूर्वी कंगना रणौतच्या बाजूनं मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सदू विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राम कदमांनी त्याच्या बाजूनं भूमिका मांडली आहे. कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
किस किस की आवाज दबाने का दुस्साहस करोगे #MVA @mybmc @CPMumbaiPolice
— Ram Kadam (@ramkadam) January 7, 2021
याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- खासदार रवी किशन हे संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
