🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
दरम्यान, या सर्व वादावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील विकासकामांसह औरंगाबादमधील स्थितीवर देखील भाष्य केलं आहे. ‘ मी औरंगाबादला जाणार आहे. तेथील विकासकामांचा आढावा घेणार आहे. तर, भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही. 5 वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केलं नाही.’ असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
CMO ट्विट वाद वाढला !
मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय खात्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये ‘संभाजीनगर’ आणि कंसात औरंगाबाद असा उल्लेख केल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर संदर्भात भूमिका ठाम असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. शिवसेनेच्या काही नेत्यांनी याचं स्वागत देखील केलं.
यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे नाराजी उघड केली होती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र वेगळीच शंका येत असल्याचं समोर येत आहे. ‘ड्रेस कोड चा निर्णय कसा समोर आला याबाबत सर्व अनभिज्ञ होतो, असे निर्णय होताना तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घ्यावा असे ठरवलं. संभाजीनगरच्या बाबतीत, असं काही झालं का? हे तपासून पाहत आहे. कोणी जाणीवपूर्वक केलं का हे तपासणार असल्याची’ माहिती देखील त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- CMO ट्विट : ‘संभाजीनगर’ उल्लेखावरून अजित पवारांना शंका; चौकशी होणार
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- ‘शिवसेना वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती,मात्र…’; पक्ष सोडताना ‘हा’ नेता झाला भावूक
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
