Share

शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्यावर्षी शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यामुळे दोन दशकांहून अधिक काळ मित्र असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये जरी संघर्ष दिसून येत असला तरी ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुन्या मैत्रीचा ओलावा कायम असल्याचं आजच्या एका घटनेने सिद्ध झालं आहे. केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची आज भेट घेतली. ही भेट जोशींच्या निवासस्थानी झाली.

त्यांची भेट घेताना नितीन गडकरी यांनी जोशी सरांना आदरपूर्वक वाकून नमस्कार केला. या घटनेमुळे जुनी मैत्री तापत्या राजकारणात देखील कशी जपावी याचं उत्तम उदाहरण निर्माण झालं आहे. वयोमानामुळे मनोहर जोशी सद्या राजकीय वर्तुळातून काहीसे बाजूला झाले आहेत. मात्र अशातही त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांशी आपले ऋणानुबंध जपले आहेत.

मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. त्यावेळी नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. याच काळात गडकरींनी राज्यासाठी अनन्यसाधारण महत्व असलेल्या मुंबई-पुणे महामार्ग निर्माणासाठी पुढाकार घेतला होता. पक्षांमध्ये राजकीय कटुता जरी निर्माण झाली असले तरी मैत्री कशी जपावी हे युवकांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवे. अनेकदा निवडणूका, इतर राजकीय निर्णय, आदी घटनांमुळे दोन चांगले मित्र विभक्त झाल्याचे आपण अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहत आलो आहोत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!