🕒 1 min read
कणकवली:- गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर आज टीका केली.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलत होते.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या सहा आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- CMO ट्विट : ‘संभाजीनगर’ उल्लेखावरून अजित पवारांना शंका; चौकशी होणार
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- ‘शिवसेना वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती,मात्र…’; पक्ष सोडताना ‘हा’ नेता झाला भावूक
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

