🕒 1 min read
नवी मुंबई:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.
नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर औरंगाबाद मनपासाठी गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शेखर इनामदार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रभारी म्हणून काम पाहतील.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- खासदार रवी किशन हे संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

