इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. क्रिकेटरसिकांसाठी असलेल्या या खास पर्वणीवर मात्र आज पावसाने पहिल्या दिवशी पाणी फेरले आहे. साउथहॅमप्टटनमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजतापासून सामना सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे ना नाणेफेक झाली ना खेळ सुरु होऊ शकला.
आता भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामना उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता या कसोटीच्या निकालासाठी राखीव दिवस नसणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागेल. दरम्यान, आता चाहत्यांचे लक्ष उद्याच्या दिवसाकडे असून पावसामुळे खेळपट्टीसह मैदानात झालेले बदल आणि भारतीय संघावर होणारा त्याचा परिणाम यामुळे भारताने कालच जाहीर केलेल्या प्लेइंग ११ म्हणजेच सामन्यासाठी खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये बदल केला जाऊ शकतो.
‘टॉस अजून न झाल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला त्यांच्या अंतिम ११ बदल करण्यासाठी २४ तासांचा कालावधी मिळाला आहे. याबाबत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही त्यांचं मत मांडले आहे. तर, ‘नाणेफेक करण्यापूर्वी टीम बदलली जाऊ शकते. जोपर्यंत दोन्ही कर्णधार खेळाडूंच्या नावाची यादी एकमेकांना देत नाहीत, तोपर्यंत काहीच अंतिम नसतं. त्यामुळे भारतानं एका फिरकीपटूला बसवून अतिरिक्त फलंदाज खेळवायला हवा.’ असं मत माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे भारतीय संघाबाबत कर्णधार, संघ व्यवस्थापन आणि कोच काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत भारताचे प्लेइंग ११ खेळाडू ?
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
पर्यायी खेळाडू कोणते ?
लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील ‘या’ शहरात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही मिळणार लस
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- ‘मोदी आता वाराणसीलाही व्हेनिस बनवल्याचा दावा करतील!’
- ‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’
- जुलै महिन्यात जनशताब्दी, नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

