मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहिल्यामुळे धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच आता ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ठाणे पालिका तृतीयपंथीयांसाठी ‘विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार आहे. उद्या 19 जून रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीनं कोरोना लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविल्यानंतर आता ठाणे महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लसीकरण मोहिमेअंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तृतीयपंथी देखील या लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर उद्या 19 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत लस घेता येणार आहे. तरी शहरातील सर्व तृतीयपंथीनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
सध्या देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोना लसीची कमतरता आहे. त्यामुळे ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे अशा व्यक्तींना सध्या कोरोनाची लस देण्यास सरकारची प्राथमिकता आहे. अशातच ठाणे पालिकाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी आता वाराणसीलाही व्हेनिस बनवल्याचा दावा करतील!’
- ‘अजित पवारांमुळे ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी निधी मंजूर’, धनंजय मुंडेंची माहिती
- नवनीत राणा यांची सुप्रीम कोर्टात धाव, ‘माझे जात प्रमाणपत्र वैधच, विजय सत्याचाच होणार!’
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी


