Share

‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान

Published On: 

उस्मानाबाद : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असून आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाजप राज्यात स्वबळावरच लढणार असल्याच जाहीर केले.

यामुळे येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय भूमिका घेणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत भाष्य केलं होतं. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. असं असताना महाविकास आघाडीतील उर्वरित दोन पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं संजय राऊत म्हणाले होते. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राऊतांच्या या भूमिकेचं समर्थन केलंय.

आता राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी उस्मानाबादमध्ये माध्यमांशी बोलताना स्वबळाच्या मुद्द्याबाबत भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही. प्रत्येकाला आपले आमदार वाढवण्याचा अधिकार आहे. शरद पवार असतील अजित पवार असतील यांनी आम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवून काम करा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही काम करत असतो,’ असं राजेश टोपे म्हणाले.

यासोबतच, ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सुद्धा इच्छा आहे की, समन्वय ठेवून काम करायला हवं. त्यानुसार काम सुरू आहे. आम्ही सरकारमध्ये स्थिर आहोत आणि पुढील निवडणुका आम्ही एकत्र लढणार ,’ असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!