Share

‘मोदी आता वाराणसीलाही व्हेनिस बनवल्याचा दावा करतील!’

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सध्या धुवांधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेय. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात तर रस्त्यावरही पाणी साचलेय. सोशल मीडियातून याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. अशाच एका फोटोला रिट्विट करत कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत टोला लगावला आहे.

येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ही परिस्थिती आहे पंतप्रधानांच्या मतदारसंघात..आता ते वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील’.

नरेंद्र मोदी यांनी ज्या गावांना स्मार्ट सिटी बनवण्याचा दावा केला होता, त्यापैकी वाराणसी एक आहे. मात्र, पावसानंतर तिथली परिस्थिती फारच बिकट झाली आहे. वाराणसीच्या सर्व मुख्य रस्त्यांवर तसंच बाजारपेठेतही पाणी भरलं आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे एक अपघातही झाला होता. बाईकवरुन जाणारे तीन युवक एका मॅनहोलमध्ये पडले. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं. पण दोघांना आपला जीव गमवावा लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!