Share

जुलै महिन्यात जनशताब्दी, नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता

Published On: 

औरंगाबाद : कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी अनेक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या वाढल्याने या रेल्वेंवर ताण येत आहे. मुंबईला सध्या मोजक्याच रेल्वे धावत आहे. या रेल्वेवर प्रवासी भार वाढत आहे. आगामी जुन महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात जनशताब्दी एक्सप्रेस आणि नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या सुत्रांनी व्यक्‍त केली आहे.

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी असल्याकारणाने औरंगाबाद रेल्वे मार्गावर चालणार्‍या अनेक रेल्वे रद्द केल्या होत्या. औरंगाबादहून मुंबई तसेच हैदराबाद मार्गावरील जनशताब्दी, नंदीग्राम, शिर्डी विजयवाडा, काकीनाडासह औरंगाबाद रेनीगुंटा सह अन्य रेल्वे रद्द केल्या आहेत. मात्र, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली आहे. तरीही कोरोना उद्रेक होऊ नये. यासाठी राज्य शासनाकडून काळजी घेण्यात येत आहे.

याअंतर्गत अनेक प्रदेशांमधुन किंवा राज्यांतर्गत चालणार्‍या रेल्वे संख्या वाढविण्याबाबतही प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर मुंबईसाठी तपोवन, देवगिरी, नांदेड मुंबई विशेष रेल्वे सुरू आहे. गेल्या काही दिवसात निर्बंध उठल्यानंतर या रेल्वेतून जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे.

या रेल्वेत बुकींग फुल्ल झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. बुकींग क्लोज अशी सुचना येत आहे. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी जनशताब्दी रेल्वे आणि नंदिग्राम रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. आगामी काही दिवसात या मुंबईकडे जाणार्‍या या दोन्ही रेल्वे सह अन्य काही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!