Share

‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविडच्या काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मच्याऱ्यांना निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे.

यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, भाजप नेते निलेश राणे यांच्यासह काही भाजप नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. अशातच आता भाजपच्या एका नेत्याने मात्र अजित पवार यांच समर्थन केलं आहे. ‘अजित पवार हे सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांना भेट देत असतात. मात्र, आशा सेवकांनी अजित पवार यांचा ताफा अडवून निवेदन देणं अयोग्य आहे. अशा वेळी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार काही बरेवाईट झाले तर?’ असा सवाल भाजप नेते अवधूत वाघ यांनी उपस्थित केला आहे.

‘आशा वर्कर्सनी अजित पवार यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न व दादांनी ते न घेताच निघून जाणे अशा स्वरूपाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खरं तर ताफा अडवून निवेदन देणे हे अयोग्य.दुसरेही मार्ग आहेत. अशा वेळी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? काही बरेवाईट झाले तर? मी दादांना ओळखतो.’ असं वाघ म्हणाले.

यासोबतच, ‘अजित पवार हे सकाळी ७ पासून ते लोकांना भेटतात. जे जे शक्य आहे त्याची त्वरित दखल घेतात. त्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी जाऊन निवेदन द्यायला कोणी अडवल आहे? राजकीय विरोधक असले तरी अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात हे मी जरी भाजपा चा असलो तरी मान्य केलेच पाहिजे,’ असं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!