Share

डब्ल्युटीसी फायनल! संथ खेळी करणाऱ्या पुजाराला स्टेनने दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.

या सामन्यात भारताच्या डावात चेतेश्वर पुजाराच्या खेळीवर सर्व स्तरातुन टिका होत आहे. पुजाराने ५४ चेंडुचा सामना करताना केवळ ८ धावा केल्या त्याही चौकाराच्या सहाय्याने त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याला एक सल्ला दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने पुजाराच्या खेळीचे विश्लेशणाच्या आधारे तो स्ट्राईक रोटेट करु शकत होता मात्र त्याने तसे केले नाही. तेव्हा त्याने खेळपट्टीचा विचार न करता संधी मिळेल तशी स्ट्राईक रोटेट करायला हवी. त्याचा संघाला फायदाच होईल असा सल्ला दिला.

डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराने धावांचे खाते खोलण्यासाठी तब्बल ३५ चेंडु घेतले आणि ३६व्या चेंडुवर खाते उघडले. डब्ल्युटीसी स्पर्धेत पुजाराने ९ अर्धशतके झळकावली आहे. द वॉल राहुल द्रविड नतंर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर तो खेळत असतो. गेल्या अनेक वर्षापासुन त्याने या क्रमांकावर आपले योगदान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!