लखनौ – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण घडवून आणले जात असल्याचं समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.
गोरगरीब जनतेशी संपर्क वाढवून त्यांना आर्थिक आमिष दाखवून तसेच अडचणीच्या काळात मदत करत असल्याचा दिखावा करून धर्मांतर घडवून आणले गेले असावे अशी शक्यता नेहमीच वर्तविण्यात येते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला असून या राज्यात बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतर करण्यात येत होते असे समोर आले आहे. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लालूच देऊन त्यांचे धर्मातरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआयचे फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे.
पोलिसांनी म्हटले आहे, की या धर्मांतरणानंतर संबंधित महिलांचे विवाहदेखील लावून देण्यात आले आहेत. या कामासाठी एक संपूर्ण टोळीच कार्यरत होती. या लोकांचे रॅकेट आणखीही काही राज्यांत सक्रिय असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.
यावेळी, जवळपास एक हजार लोकांचे धर्मांतरण करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले.दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता संतापाची लाट उसळली आहे. सोबतच या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजप नेत्यांना होऊ लागल्या गुदगुल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

