🕒 1 min read
औरंगाबाद : अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकीटघराजवळ शनिवारी पहाटे बिबट्या आढळल्याची क्लिप सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याची पुष्टी करण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’ने उपवनरक्षक ए जी पाटील यांना विचारणा केली असता. त्यांनी याबाबत होकार देत उपाय योजना करण्यात आल्याचे सांगितले. तर अजिंठा लेणीचे ज्ञानेश्वर दानवे यांनी कुंडाजवळ पाणी पिण्यासाठी आल्याचा संशय व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठा लेणीच्या तिकीटघराजवळ वाघ आढळल्याची एक क्लिप व्हायरल झाली आहे. याबाबत महाराष्ट्र देशाने लेणी प्रशासन तसेच, वन विभागाला यासंदर्भात माहिती विचारली. त्यावर त्यांनी तो वाघ नसून बिबट्या असल्याचे सांगितले. अजिंठा लेणी परिसर हा दाट जंगलात असून दर ५० मीटरला सुरक्षा रक्षक तैनात असतात. लेणी परिसरात प्राण्यांचा वावर नवीन नाही. तसेच लेणी जवळील कडे, पठार हा बिबट्याचा अधिवास आहे. त्यामुळे इथे अनेक वेळा बिबट्या पहावयास मिळाला. परंतु त्याने कोणालाही आज पर्यंत इजा केली नसल्याची नोंद असून या संदर्भात उपाय योजना राबवत असल्याचे, दानवे यांनी सांगितले.
अजिंठा लेणी परिसरात बिबट्या असल्याचे कळविण्यात आल्यानंतर वन विभागाने या गोष्टीचा पाठ पुरावा करायला सुरुवात केली असून, या परिसरात वन विभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहे. अजिंठा परिसरातील डोंगर हा बिबट्याचा आवडता अधिवास आहे. या ठिकाणी वावरतांना काळजी तसेच सावधान पणे फिरावे. बिबट्या आढळण्याची विशिष्ट वेळ नाही. लेणी मधील तिकीटघर परिसरात पहाटे आढळल्यानंतर उपाय योजना करण्यात आल्या आहे. वन विभाग या सर्व हालचालींकडे लक्ष ठेऊन असल्याचे उपवनरक्षक ए जी पाटील यांनी सांगितले. तर लेणी कर्मचाऱ्यांना परिसरात वावरत असतांना काय करावे, अशा सुचना देण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी मांगधरे यांनी सांगितले.
बिबट्या सहसा आपल्या सीमेचे आणि मादीचे रक्षण करण्यासाठी न कळत लोकवस्तीत येतो. दुसऱ्या बिबट्यापासून आपल्या सीमा, मादी यांचे रक्षण करण्यासाठी विविध भागात तो विष्ठा किंवा मुत्र सोडत असतो. आणि त्याच्याच सहाय्याने त्याचा वावर तिथे पुन्हा होण्याची शक्यता असते. यासाठी उपाय योजना करण्याचे काम वन विभागाने करण्याची आवश्यकता असते. अजिंठा येथे वन विभागाने ‘या भागात बिबट्याचा वावर असल्याचे’ फलक जागोजागी ठळक लावावे. त्याबरोबरच नागरिकांनी वावरतांना शांततेत न वावरता तसेच एकटे न फिरता, समूहासोबत फिरत मोठ्याने गप्पा मारत, अथवा आवाज केल्याने सहसा हिंस्त्र प्राणी जवळ येत नाही. दक्षता घेत आनंद व्यतीत करण्याचे प्राणी तज्ञ दिलीप यार्दी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
