Share

महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही – नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.

यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. सरनाईकांचं हे पत्र म्हणजे शिवसैनिकांच्या मनातली भावना असून दबावातली अनैतिक आघाडी सोडावी अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचं सत्तास्थापनेचं स्वप्न पूर्ण होणार नसून हे सरकार खंबीर असल्याचं भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्रात भाजप सत्तेत येण्याची स्वप्न बघत आहेत. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत आहे. या सरकारला कुठलीही अडचण येणार नाही,’ असा विश्वास देखील नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!