Share

मराठी अभिनेत्रीचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर योगा

Published On: 

मुंबई : आज सर्वत्र योग दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 21 जून रोजी हा साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. योगामुळे आपले शरीर निरोगी राहते. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.

योग दिवस मराठी कलाकारांनी देखील साजरा केला आहे. कलाकारांनी योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कलाकार यावेळी आपल्या चाहत्यांना योगा करण्याचा सल्ला देखील देताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री कृतिका गायकवाडने योग साधना करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

https://www.instagram.com/p/CQXkdpwJAse/?utm_medium=copy_link

कृतिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कृतिकाने मुंबईतील एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर योगसाधना केली.’युवा डान्सिंग क्वीन’ फेम कृतिकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर योगसाधना केली. हे फोटो पोस्ट करत कृतिकाने चाहत्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कृतिका गायकवाडने ‘नेबर्स’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याशिवाय तिने ‘बंदिशाळा’ चित्रपटात लावणी केली होती. तसेच ‘लाखो है यहा दिलवाले’ या हिंदी चित्रपटामध्येही तिने काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!