मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.
या सामन्यात न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउथीने दुसऱ्या डावात भारताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत त्याच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. तसेच यासामन्यात फलंदाजीदरम्यान त्याने ४६ चेंडुत ३० धावा करत संघाच्या डावाला हातभार लावला होता. या खेळीदरम्यान साउथीने २ षटकार लगावले होते. या दोन षटकारासंह साउथीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगला मागे टाकले आहे. या सामन्यापुर्वी रिकी पॉटिंग आणि टीम साऊथी यांच्या नावावर प्रत्येकी ७३ षटकार होते. या सामन्यात दोन षटकार मारत टीम साउथीने पॉटिंगला मागे टाकले आहे.
आता या यादीत तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या षटकारापासुन केवळ ३ षटकारांनी मागे आहे. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ७८ षटकार लगावले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर न्युझीलंडचाच ब्रॅण्डन मॅक्कलम असुन त्याने कसोटीत १०७ षटकार लगावले आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ऍडम गिलख्रिस्टने १०० षटकार मारले आहे. आतापर्यंत साउथीने या यादीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स आणि रिकी पॉन्टिंग या दिग्गज खेळाडुंना मागे टाकलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचा ‘तो’ संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय; नाना पटोलेंच पुन्हा मोठं विधान
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

