पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द झाल्याने राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल जाहीर केला, हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने आगामी काळात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो असे चित्र आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची दोन महिने वाट पाहिली. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं कुणी ऐकत नाही असं सांगत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला मुख्य विरोधी पक्ष असणारा भाजप या मुद्द्यावरून आक्रमक झाला असून येत्या २६ तारखेला राज्यभर आंदोलन करणार आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय होत असल्याचे सांगत या निवडणुका होऊ देणार नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान,ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनी देखील केले होते. ओबीसी आरक्षण हा फक्त भाजपासाठीच नव्हे तर महाविकास आघाडीसाठी देखील महत्वाचा मुद्दा असल्याचे ओळखूनच भुजबळ-वडेट्टीवार स्वतः मंत्री असून देखील आंदोलन करू लागले आहेत,मेळावे घेऊ लागले आहेत.महाविकास आघाडी सरकारमधील या नेत्यांचा त्यांचे कार्यकर्त्यांचा ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारमुळेच कसे गेले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यामुळेच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आता आरोप करत असून राज्यातील वातावरण या मुद्द्यावरून आगामी काळात ढवळून निघणार आहे हे मात्र निश्चित.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन् भर मैदानात शमीने केला काजोलचा ‘डीडीएलजे’मधील तो सीन रिक्रिएट
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

