Share

डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गग्रस्तांचे आकडे घटत चालले आहेत. त्यामुळे दिलासादायक वातावरण तयार होत आहे. तसंच लसीकरणाचा वेगही हळूहळू वाढतो आहे. सध्या ओसरत असलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला होता. B.1.617.2 हे त्याचं शास्त्रीय नाव, पण त्यात सातत्याने म्युटेशन होत असून, ते मोठ्या चिंतेचं कारण आहे.

कारण अशा म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने आता अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस असं संबोधलं जात आहे. हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे. या तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावलं उचलावीत असे निर्देश केंद्राकडून या तीन राज्यांना देण्यात आले आहेत.

डेल्टा व्हेरिएंट किती घातक?
डेल्टा व्हेरिएंट किंवा बी.१.६१७.२ व्हेरिएटमुळेच भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचं मानलं जात. आकडेवारीनुसार यूनायटेड किंग्डममध्ये सध्या तिसरी लाट आली असून त्यासाठी हा डेल्टा व्हेरिएंटच जबाबदार आहे. आता डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये झालं आहे. भारतामध्ये सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कोरोनाच्या या उत्पपरिवर्तीत विषाणूचे म्हणजेच डेल्टा प्लसचे महाराष्ट्रामध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी यात रत्नागिरी जिल्ह्य़ात नऊ, जळगाव जिल्हा सात, मुंबईत दोन, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केलं. केरळमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आलेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!