Share

आमचा ‘तो’ संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय; नाना पटोलेंच पुन्हा मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच टोलेबाजी सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. नाना पटोले हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘स्वबळाचा संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला आहे. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असून, ते कामाला लागले आहेत. त्यामुळं आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ त्यामुळे नाना पटोले हे काँग्रेसच्या स्वबळावर ठाम असल्याचं पुन्हा समोर आलं आहे.

‘निवडणुकांवर डोळा ठेवून आम्ही स्वबळाचा नारा दिलेला नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी असतानाच आम्ही भूमिका मांडली आहे. त्यावर ठाम आहोत. काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात दोन हात करेल,’ असं देखील देखील पटोले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!