नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय मंचच्या नेत्यांव्यतिरिक्त विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनीही राष्ट्र मंच अंतर्गत भाग घेतला. पवारांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला.
भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.मात्र ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की,देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्याचे व्हिजन सरकारकडे नाही. सरकारला ते व्हिजन देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचे बैठकीतून समोर आले आहे. शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती असे ते म्हणाले.
आज देश में जो राजनितिक और आर्थिक वातावरण बना हुआ है, वो ठिक करने के लिए राष्ट्र मंच क्या करत सकता है, इसपर आज की बैठक में विचारविमश हुआ । सभी सदस्यों के सुझाव सुने गये। बैठक में जावेद अख्तर साहब, जस्टिस ए. पी. शाह जैसे नॉन पॉलिटिकल सदस्य भी उपस्थित थे । उन्होंने भी अपनी बाते रखी।
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 22, 2021
दरम्यान, या बैठकीवर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा राजकारणात शून्य अस्तित्व असलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नसल्याने नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे.
पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका आणि, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची पवार यांची धडपड यांमुळे अगोदर अस्तित्वात असलेली युपीए आघाडी अधिक मोडकळीस आली आहे. पहिल्या आघाडीचा अस्त होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचा नव्या आघाडीचा प्रयत्न हे त्यांच्या राजकीय नैराश्याचे प्रतिबिंब आहे असे देखील भाजपचे म्हणणे आहे.
दरम्यान, भाजपच्याच टीकेला प्रमाण मानून आपण ही बैठक केवळ बातमीत राहण्याचा प्रयत्न आहे असे जरी आपण मान्य केले तरीही भाजपला या बैठकीची दाखल घ्यावी लागली यातच सर्व काही आले.भाजपच्या दृष्टीने ही बैठक एवढी महत्वाची नसेलच तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सर्वजण का या बैठकीवर टीका करत आहे या प्रश्नांचे उत्तर काही भाजपचे नेते देताना दिसत नाहीयेत. बैठक यशस्वी झाली की नाही हे येत्या काही काळात स्पष्ट होईल मात्र भाजपच या बैठकीवर टीका करून या बैठकीला महत्व प्राप्त करून देत आहे हे देखील या निमित्ताने दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

