🕒 1 min read
मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना 18 जुन रोजी सुरु होणार होता. मात्र पावसाच्या विघ्नाने पहिला दिवस एकही चेंडु न टाकता वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर न्युझीलंडच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडुन सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गील हे दोन फलंदाज सलामीसाठी आले. दोन्ही सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात करत भारतीय संघाला 62 धावांची अर्धशतकी सलामी दिली.
मात्र 34 धावांवर खेळताना जेमिनसनने रोहितला टीम साउदीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि भारताचा पहिला बळी गेला. रोहित बाद झाल्यानंतर शुभमनचा खेळ अधिकच मंदावला आणि त्यानेही 24 धावांवर वॅग्नारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वॅटलिंगकडे झेल दिला. यानंतर खेळपट्टीवर उभ्या असलेल्या पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीकडुन भारतीय संघाला अपेक्षा होती. चेतेश्वर पुजाराने पहिली धाव घेण्यासाठी 36 चेंडु धेतले. मात्र 54 चेंडुत केवळ 8 धावा काढुन तोही बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि माघारी तंबुत परतला.
यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अंजिक्य रहाणे यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. यादरम्यान 134 धावा असताना अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला. खेळ थांबवला तेव्हा कर्णधार विराट कोहली हा 44 आणि अंजिक्य रहाणे 29 धावांवर खेळत होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात किती धावांची मजल मारतो याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- WTC च्या अंतिम सामन्यात कर्णधार कोहलीच्या नावे अनोखा रेकॉर्ड
- शिवसेनेचे खोतकर केंद्रीय मंत्री दानवेंवर पडले भारी! ‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
