इंग्लंड : काल शनिवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथे खेळवण्यात आला. काल झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड झाला आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या कसोटी सामन्यांत सर्वाधित सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्त्व करणारा खेळाडू बनला आहे. यामध्ये विराटनं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला देखील मागे मागे टाकले आहे.
विराट कोहली सध्या कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात आपला 61वा कसोटी सामना खेळत आहे. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. कारण टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने याआधी 60 कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून टीम इंडिया चं नेतृत्त्व केलं होतं.
न्यूझीलँडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात केली. मात्र शुक्रवारी पावसामुळं दिवस वाया गेल्यानंतर शनिवारीही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे खोतकर केंद्रीय मंत्री दानवेंवर पडले भारी! ‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

