Share

‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापणदिनानिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगाली जनतेचं कौतुक केले. ‘स्वबळा’वर बोलताना त्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले. ‘स्वबळाचा अर्थ नुसतं निवडणुका जिंकणं नव्हे हे पश्चिम बंगालने दाखवून दिलं आहे. ममता बॅनर्जी तर लढल्याच आणि त्या जिंकल्याच पण त्यांच्याबरोबरच बंगालच्या जनतेचं देखील कौतुक आहे’ असे ठाकरे म्हणाले.

यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधलाय. टोल पलटवार केलाय. ‘ममतांचे कौतूकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय.

उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे कौतुक. ‘ममता लढल्या व जिंकल्या याला म्हणतात स्वबळ’. बरोबर त्यांचे कौतुक आहेच. कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली. सत्तेसाठी ज्यांचासोबत निवडणूका लढल्या त्यांचा विश्वासघात करत आयत्यावेळी युती मोडत विरोधकांसोबत नाही जाऊन बसल्या’ असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
स्वबळाचा अर्थ नुसतं निवडणुका जिंकणं नव्हे हे पश्चिम बंगालने दाखवून दिलं आहे. ममता बॅनर्जी तर लढल्याच आणि त्या जिंकल्याच पण त्यांच्याबरोबरच बंगालच्या जनतेचं देखील कौतुक आहे. कारण त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारचे हल्ले म्हणजेच सगळ्या प्रकारचे हल्ले झेलूनही बंगालने आपलं मत ठामपणे मांडलं. त्यांनी स्वत्व काय असतं ते दाखवून दिलं. बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणे मांडलं. ज्या बंगालने स्वांतंत्र्यलढ्यासाठी वंदे मातरम हा मंत्र दिला त्याच बंगालने स्वबळ, आत्मबळ काय असतं ते दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपावी, हे बंगालने दाखवून दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!