मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी आपल्या लाईव्ह संवादात स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्यांना सुनावले. तसेच, हिंदुत्त्व म्हणजे काय हेही समजावून सांगताना, युती अन् आघाडीबाबतही भाष्य केलं. ठाकरे यांनी महाविकास आघाडी किती दिवस टिकणार यावरही मत व्यक्त केले.
‘शिवसेनेनं महाविकास आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं का, असा अनेकांचा गैरसमज होतो. पण, हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं… हे गेलं म्हणजे हिंदुत्त्व सोडलं असं नाही. शिवसेनाप्रमुख सांगायचे हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे, जर श्वासच थांबला तर आयुष्याला काय अर्थ आहे. त्यामुळे, कोणी गरैसमज करुन घेण्याची गरज नाही की, यांनी युती तोडली, आता आघाडी केली, आघाडी किती काळ टिकणार… बघुया पुढे, त्याची काळजी कशाला करता… जोपर्यंत आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणं, गोरगरिबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी जर काही करावं लागत असेल, तर त्याचा अर्थ हे सोडलं अन् ते धरलं असं होत नाही’ असे उद्धव ठाकरे आपल्या लाईव्ह संवादात म्हणाले.
ममता बॅनर्जी यांचे कौतूक
स्वबळाचा अर्थ नुसतं निवडणुका जिंकणं नव्हे हे पश्चिम बंगालने दाखवून दिलं आहे. ममता बॅनर्जी तर लढल्याच आणि त्या जिंकल्याच पण त्यांच्याबरोबरच बंगालच्या जनतेचं देखील कौतुक आहे. कारण त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारचे हल्ले म्हणजेच सगळ्या प्रकारचे हल्ले झेलूनही बंगालने आपलं मत ठामपणे मांडलं. त्यांनी स्वत्व काय असतं ते दाखवून दिलं. बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणे मांडलं. ज्या बंगालने स्वांतंत्र्यलढ्यासाठी वंदे मातरम हा मंत्र दिला त्याच बंगालने स्वबळ, आत्मबळ काय असतं ते दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपावी, हे बंगालने दाखवून दिलंय.
मी लवकरच घराबाहेर पडणार
विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
- दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज
- बांग्लादेशच्या लढ्यात मोदी कोणत्या तुरुंगात होते? पंतप्रधान कार्यालयाने दिले ‘हे’ उत्तर
- ‘अनलॉकमध्ये गर्दी वाढत आहे, काळजी घ्या’, केंद्रीय सचिवांच्या राज्यांना सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
