Share

‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नाव न घेता विरोधकांनाही लक्ष्य केलं. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा अप्रत्यक्ष समाचारही त्यांनी घेतला.

‘गेल्या वर्षभरापासून आपण काय करतोय, हे आपलं कामचं बोलतंय. त्यामुळे, अनेकांना पोटदुखी होतेय, पोटात गोळा येतोय. सत्ता नसल्याने अनेकांचा जीव कासाविस होतोय, असे म्हणत नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केलं. तसेच, त्यांच्या दु:खण्याला इलाज करायला मी डॉक्टर नाही. जेव्हा राजकीय औषध द्यायची गरज आहे, तेव्हा राजकीय औषध जरुर देईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

यावर मुंबई भाजपने उत्तर दिलेय. दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत असे ट्विट मुंबई भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलेय.

ट्विटमध्ये म्हटलेय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत की भाजपला राजकीय औषध देणार आहे. दोन पक्षांच्या कुबड्यांवर यांचा धंदा चाललाय आणि बाता अशा करताहेत जशी दिल्ली जिंकलीय. जरा दमानं घ्या, झेपेल तेवढेच बोला मुख्यमंत्री महोदय…’ असा टोला भाजपने लगावलाय.

शिवसेनेकडून सत्तेसाठी विश्वासघात
‘स्वबळा’वर बोलताना ठाकरेंनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले. ‘स्वबळाचा अर्थ नुसतं निवडणुका जिंकणं नव्हे हे पश्चिम बंगालने दाखवून दिलं आहे. ममता बॅनर्जी तर लढल्याच आणि त्या जिंकल्याच पण त्यांच्याबरोबरच बंगालच्या जनतेचं देखील कौतुक आहे’ असे ठाकरे म्हणाले. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ‘बरोबर त्यांचे कौतुक आहेच. कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली. सत्तेसाठी ज्यांचासोबत निवडणूका लढल्या त्यांचा विश्वासघात करत आयत्यावेळी युती मोडत विरोधकांसोबत नाही जाऊन बसल्या’ असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!