🕒 1 min read
जालना : जाफराबाद येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याचा आरोप करुन दोन पीएसआय आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. यात पोलिसांची काहीच चूक नसताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती.
यावर निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांवरची कारवाई मागे घेण्यात आली आहे अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी आज शनिवारी माध्यमांना दिली. अर्जुन खोतकर यांनी बुधवारी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. या वेळी गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरण ऐकून घेतले. यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणतीच चूक नव्हती. अशा प्रकारे जर पोलिसांवर जर चुकीची कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम कसे करावे, असा सवाल खोतकर यांनी वळसे पाटील यांना केला. त्यानंतर वळसे पाटील यांनी हे निलंबन मागे घेण्यात येईल, असे सांगितल्याचे खोतकरांनी माहिती दिली होती.
काय आहे प्रकरण?
कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याबाबत दानवे यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या अशी लेखी तक्रार केली होती.
दरम्यान, भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लेखी तक्रार केल्यानंतर त्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. पण पोलिसांच्या पाठीशी उभे राहात खोतकरांनी त्यांची बाजू लावून धरली. यामुळे पोलिसांचे निलंबन मागे झाल्याचे सांगण्यात येतेय. यामुळे जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकरांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालेय. रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा विषय किरकोळ असला तरी यामधून राजकीय समीकरणे आणि प्रशासकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
- दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
