🕒 1 min read
मुंबई : भारत देशात क्रिकेट खेळात कारकीर्द घडवणे ही एक अशक्यप्राय गोष्ट असते, परंतु तरी कित्येक वर्ष असंख्य मूल आपल्याला पण भारत देशासाठी क्रिकेट खेळायला मिळेल आपण पण भारत देशाचे क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करू अशी आशा उराशी बाळगून क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. काही जणांचं देशाकरता क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण होत ,तर काही जणांचं देशाच क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. कित्येक क्रिकेट पटुंकडे उत्तम क्रिकेट खेळण्याचे कौशल्य असले तरी ते बहुदा क्रिकेट मधील राजकारणाचे बळी ठरतात. एका क्रिकेट पटूला पुढे आणण्यासाठी दुसऱ्या एका तेवढ्याच उत्तम क्रिकेट पटूचा बळी दिला जातो आणि राजकारणाला सुरुवात होते. अशीच काहीशी घटना वृद्धिमान साहा याच्याबरोबर घडली असल्याचा आरोप भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी केला आहे.
सध्या सुरु असलेल्या वेस्टइंडीज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ भारतात ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात वृद्धिमान साहाची निवड होणार नाहीये अशी माहिती वृद्धिमान साहा याला देण्यात आली असल्यामुळे त्याने आता बंगालच्या रणजी संघामधूनही माघार घेतली. वृद्धीमान साहा याला आगामी कसोटी संघातून वगळण्यात आल्याबाबत भारतीय कसोटी संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी वृद्धिमान साहाला पाठिंबा दर्शवला असून त्याचे भारतीय क्रिकेटसाठी योगदान कायम लक्षात राहील असेही ते म्हणाले आहेत. वृद्धिमान साहा याला कसोटी संघातून वगळण्यात आले याबाबत सय्यद किरमाणी म्हणाले कि, ” वृद्धिमान साहा हा एक उत्तम यष्टीरक्षक आहे यात काहीच शंका नाही. परंतु, रिषभ पंत हा आक्रमक यष्टीरक्षक तसेच आक्रमक फलंदाज असल्याने त्याला भारतीय संघात जास्तवेळा स्थान दिले जाते, मात्र त्याने निराश होण्याचे कारण नाही. तो एक उत्तम यष्टीरक्षक असून त्याच्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे, पार्थीव पटेल आणि दिनेश कार्तिक यांना देखील अश्याच प्रकारे वगळण्यात आले होते असेही ते वृद्धिमान साहा बाबतीत बोलताना म्हणाले.
वृद्दीमान साहा याने २०१० मध्ये भारतासाठी कसोटी संघात पदार्पण केले होते, त्याने आतापर्यंत १२ वर्षात भारताकरता ४० कसोटी खेळल्या असून त्याने २९ च्या सरासरीने १३५३ धावा काढल्या आहेत. त्यात त्याने ३ कसोटी शतक तर ६ कसोटी अर्धशतक झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा कोरोना बाबतीत मोठा खुलासा
- जालन्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; दीरानेचं केला वाहिनीवर बलात्कार
- …हा प्रकल्प संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल- नितीन गडकरी
- पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीमध्ये आघाडीसाठी बिघाडी
- Breaking News : बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा कारावास

