🕒 1 min read
मुंबई : गंगा नदीवरील 14.5 किमी लांबीचा ‘रेल्वे-कम-रोड-ब्रिज’ आणि दोन्ही बाजूंच्या ऍप्रोच रोडचा आज(११ फेब्रु.) लोकार्पण सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आभासी माध्यमातून उपस्थित होते.
यासांदर्भात नितीन गडकरी यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘बिहार राज्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून NH-333B वर 696 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गंगा नदीवरील 14.5 किमी लांबीचा ‘रेल्वे-कम-रोड-ब्रिज’ आणि दोन्ही बाजूंच्या ऍप्रोच रोडचे राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय राज्यमंत्री विजय कुमार सिंह, उपमुख्यमंत्री रेणू देवी तसेच बिहारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्राला सुपूर्द केले.’
बिहार राज्य के लिए आज एक ऐतिहासिक दिन है। NH-333B पर 696 करोड़ रुपए की लागत से बने 14.5 किमी लंबे ‘गंगा नदी पर रेल-सह-सड़क-पुल’ और दोनो तरफ एप्रोच मार्ग राज्य के मुख्यमंत्री श्री @NitishKumar जी, केंद्रीय मंत्री श्री @girirajsinghbjp जी,… pic.twitter.com/u9ZG98diay
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 11, 2022
पुढे ते म्हणाले की,‘बिहारमधील प्रमुख पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांपैकी एक, मुंगेर शहर त्याच्या समृद्ध प्राचीन इतिहास, संस्कृती, शिक्षण आणि व्यापारासाठी ओळखले जाते. या पुलाच्या निर्मितीमुळे मुंगेर ते खगरिया हे अंतर 100 किमी पेक्षा कमी होईल आणि मुंगेर ते बेगुसराय हे अंतर 20 किमी पेक्षा कमी होईल. त्यामुळे मुंगेर ते खगरिया – सहरसा प्रवासात तीन तास आणि मुंगेर ते बेगुसराय – समस्तीपूर प्रवासात ४५ मिनिटांची बचत होणार आहे. या रेल्वे-कम-रस्ते-पुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. इंधनाची बचत होईल. वाहतुकीला वेग येईल.’
दरम्यान, यामुळे पर्यटन, शेती आणि उद्योगात वाढ होऊन रोजगार वाढेल. हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशात प्रगती आणि समृद्धी आणेल, जो बिहार राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही बिहारमधील प्रत्येक शहर, प्रत्येक गावाला चांगल्या कनेक्टिव्हिटीसह सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- सोमय्यांना सीआयएसएफने संरक्षण दिले पाहिजे होते; जयंत पाटलांचा सल्ला
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
