अमरावती : न्यायालयाने राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू(Bachhu Kadu) यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कारावासासोबत त्यांना २५ हजारांचा दंडही भरावा लागणार आहे.भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी मुंबईमध्ये ४२ लाख ४६ हजार रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. परंतु तद्पश्चात २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी या फ्लॅटसंदर्भातील माहिती निवडणूक आयोगापासून लपवली, असा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा केला होता.
महत्वाच्या बातम्या:
- सोमय्यांना सीआयएसएफने संरक्षण दिले पाहिजे होते; जयंत पाटलांचा सल्ला
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

