Share

महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा कोरोना बाबतीत मोठा खुलासा

Published On: 

नागपूर: २०२० च्या मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूने बाधित झालेला पहिला रुग्ण सापडला आणि कोरोना विषाणूने हळू हळू राज्यभरात आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. २०२१ च्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्र राज्यात हाहाकार माजवायला सुरुवात केली. २०२१ च्या डिसेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असली तरी बहुसंख्य जनतेचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा घेतल्या असल्याने कोरोनाची तिसरी लाटीची तीव्रता एवढी मोठी नाही.

या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज एक माहिती दिली आहे. आता कोरोना महामारीची स्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र राज्य पण अनलॉकच्या (UNLOCK) दिशेने वाटचाल करीत आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार बोलताना यावेळीज  म्हणाले कि ,कोरोनाचे निर्बंध शिथील होत असले तरीही मास्कमुक्ती मात्र होणार नाही. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले. पण सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांत ही कार्यवाही करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्र राज्य अनलॉक करण्यात येणार आहे, मात्र मास सक्ती हटवण्यात येणार नाहीये असेही ते या वेळेज म्हणाले. तरी त्यांनी या वेळेज महाराष्ट्रातील जनतेला कोरोनापासून काळजी घ्यायचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

       महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!