Share

राज्यपालांच्या खासगी सचिवपदी सेवानिवृत्त अधिकारी नेमणे चुकीचे – नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी त्यांच्या खासगी सचिवपदी निवृत्त अधिकारी उल्हास मुणगेकर यांची नियुक्ती केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपले विचार मांडले. निवृत्त व्यक्तीला नियमित पदासाठी नियुक्त करता येत नाही. या नियुक्तीसाठी राजभवनातूनच आदेश निर्गमित झाले आहेत. राजभवनामधून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही, असे सांगत एका निवृत्त अधिकाऱ्याची पुन्हा नियुक्ती करण्याचा मोह कशासाठी?, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, ‘सेवा निवृत्त व्यक्तीला नियमित पदावर नियुक्त करता येत नाही, यासाठी राजभवनातून आदेश निगमित झालेत. हजारोंच्या संख्येने राज्यात सनदी अधिकारी काम करत असतात, त्याच्यातून एखादा व्यक्ती नियुक्त करण्याचा अधिकार राजभवनाला आहे. पण सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा नेमणे, हे चुकीचे आहे. याप्रकारची नेमणूक नियमांचा भंग आहे आणि राजभवनातून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही. राजभवनात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे, की कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही. अधिकारी सेवानिवृत्त झाला की मग त्याचा मोह कशासाठी?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मला अपेक्षा आहे की राज्यपाल याकडे लक्ष देतील आणि त्यशिवाय सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील.’

राज्यपाल महोदय ज्याप्रमाणे १२ आमदारांचा विषय, विद्यापीठ कायदा विषय अशा सर्व गोष्टींवर कायदेशीर सल्ला घेत असतात त्याच रीतीने या नियुक्तीबद्दलही कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे, अशी बेकायदेशीर नियुक्ती योग्य नाही, टोला ही त्यांनी लगावला. वर्ष २०१६ च्या सरकारी आदेशानुसार नियमित पदावर कॉन्ट्रँक्ट पद्धतीने नियुक्ती शक्य नाही. या नियमाकडे दुर्लक्ष्य करत राज्यपालांनी उल्हास मुणगेकरांची नेमणूक केली आहे. मुणगेकरांना २० जुलाई २०२१ला एक वर्षासाठी कॉन्ट्रँक्ट पद्धतीने नियुक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!