औरंगाबाद: आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात शिवतेज संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेष दौरा व संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर रोहयो मंत्री संदिपान भुमरे(Sandipan Bhumre), राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या विशेष उपस्थित बैठक होणार आहे.
३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक शिवसेना भवन, सिल्लोड येथे पार पडली तर दुपारी २ वाजता हॉटेल ऑरेंज फ्लॅग, फुलंब्री येथे फुलंब्री मतदारसंघाची बैठक घेण्यात आली. शहरातील पुंडलिकनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकांमध्ये कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहे. यावेळी आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकांमध्ये येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच औरंगाबाद महानगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी रणनिती आखली जाणार आहे. या सर्व बैठकांना शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिक्षकसेना, भारतीय कामगार सेना आदींसह सर्व अंगीकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक, लोकप्रतिनीधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार किशनचंद तनवाणी, सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

