🕒 1 min read
नवी दिल्ली : दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज भारत दौऱ्यावर येणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय तसेच ३ टी-२० सामने होणार आहेत. हे ६ मर्यादित षटकांचे सामने अहमदाबाद आणि कोलकत्ता या शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. कोलकत्ता शहरात टी-२० सामन्यांच आयोजन झाल्यावर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. मात्र बीसीसीआयने या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेची तयारी करत आहे.
या वेस्टइंडीज दौऱ्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती.मात्र आता त्याच्या वेळापत्रकात बीसीसीआय तर्फे बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारत आणि लंका यांच्यात टी-२० मालिका होणार आहे.
दोन्ही संघातील पहिली कसोटी ४ ते ८ मार्च रोजी होणार असून ती बेंगळुरू ऐवजी मोहाली येथे खेळवली जाणार आहे. त्यामुळे विराट त्याची १००वी कसोटी मोहाली मैदानावर खेळले. अर्थात या गोष्टीची अधिकृत घोषणा अद्याप बीसीसीआयकडून झालेली नाही. भारतात सध्या सतत वाढणाऱ्या कोरोना महामारीमुळे बीसीसीआयने बेंगळुरू येथील कसोटी सामना मोहाली येथे हलवला आहे.\
महत्वाच्या बातम्या :
- “संविधानावर सहानुभूतिपूर्वक…”; तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार
- राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला सर्वाधिक मते; निकाल मात्र प्रलंबित
- क्रिकेट प्रेमींना महिला क्रिकेट लीगची पर्वणी
- “गृहमंत्र्यांच्या घरात मणिपूरच्या नेत्यांना बुट काढायला लावले…”; राहुल गांधींचा आरोप
- पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप आराखड्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
