Share

दाऊदच्या नावाची धमकी देऊन मुंबईत लेखिकेवर बलात्कार ; FIR दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जुहू परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या बलात्कार प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे नाव पुढे आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने पीडितेला धमकी दिली होती. तसेच पोलिसात तक्रार केल्यास मी त्याला ठार मारेन, असे सांगितले. पीडित महिलेने आरोपीविरुद्ध मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) एन,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे या व्यावसायिकाविरोधात तक्रार नोंदवू नये यासाठी ‘डी’ गँगकडून फोनही आल्याचा आरोप महिलेने केला आहे.

आरोपी व्यावसायिकाने पीडित महिलेकडून २ कोटी रुपये कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. पीडित महिलेने जेव्हा तिच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी व्यावसायिकाने दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांकडून तिचे नाव घेऊन थेट महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकू, अशी धमकी तिला देण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास आंबोली पोलिसांकडून एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस महिलेच्या दाव्याची चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!