🕒 1 min read
सोलापूर : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, हा वादाचा मुद्दा ठरला. यावर राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त करत ठिकठिकाणी निदर्शने ही केली. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा असल्याचे सांगितले होते. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर आता यावर आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“तीर्थक्षेत्र तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थळी देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान कसा होतो?” असा सवाल करीत सदाभाऊ खोत यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. “पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी.”, असा खोचक सल्ला ही देखील खोत यांनी दिला.
सोलापुरात खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार कुटुंब यांच्या सोबतच त्यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. देहू येथे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाषण करू शकले. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र बोलण्याची संधी दिली गेली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावरच प्रतिक्रिया देताना खोत यांनी पवार कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्र नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
