मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नवा वाद निर्माण झाला आहे. देहू, पुणे येथील मंदिराच्या उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार, खासदार, नगराध्यक्षांचे पासेस गायब केले. उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतून काढले. पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायला हवी.”
हा महाराष्ट्राचा अपमान –
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले असून, ही गंभीर बाब आहे. हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि प्रोटोकॉल अंतर्गतच दिल्लीतील कार्यालयात भाषणासाठी पत्र लिहिले, परंतु प्रतिसाद आला नाही.
भाजपचे स्पष्टीकरण-
देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खासगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.
तसेच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपसाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राच द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत स्वतःचा अहंकार नाही. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे त्यामुळे त्यांना औषध नाही, असा टोलाही भाजपने लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

