Share

ICCच्या एलिट पॅनलमध्ये नितीन मेनन कायम, प्रथमच विदेशात करणार अंपायरिंग!

Published On: 

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताचे पंच नितीन मेनन यांना पंचाच्या एलिट पॅनेलमध्ये कायम ठेवले आहे. या महिन्याच्या अखेरीस मेनन प्रथमच श्रीलंकेत तटस्थ पंच म्हणून काम पाहतील. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत ते अंपायरिंग करताना दिसतील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की आयसीसीने एलिट पॅनेलमधील मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. एलिट पॅनलच्या ११ सदस्यांमध्ये इंदूरचे ३८ वर्षीय मेनन हे एकमेव भारतीय आहेत. गेली ३-४ वर्षे ते आमचे मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस ते तटस्थ पंच म्हणून पदार्पण करेल.

मेनन यांचा २०२०मध्ये कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. एस. वेंकटराघवन आणि एस. रवी यांच्यानंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे ते तिसरे भारतीय पंच बनले. आयसीसीने प्रवासी निर्बंधांमुळे स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिल्यानंतर मेनन केवळ भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच काम करू शकत होते.

नितीन मेनन यांना अनुभव कमी असला तरी ते फार कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट पंच अशी प्रतिमा निर्माण करू शकले आहेत. नितीन मेनन यांनी ११ कसोटी, ३० एकदिवसीय आणि २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली आहे. याशिवाय ते अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!