मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन कोरोनामधून बरा झाला आहे. लीड्स येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (ENG vs NZ) विल्यमसन न्यूझीलंड संघात परतला आहे. नॉटिंगहॅममधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केन विल्यमसन कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे त्याला त्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याचवेळी त्या सामन्यात न्यूझीलंडलाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर विल्यमसनला पाच दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता तो बरा होऊन परतला आहे.
विल्यमसनच्या पुनरागमनाबाबत न्यूझीलंडच्या ट्विटर हँडलवर अपडेट देण्यात आले. टीमने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये विल्यमसन बसमधून उतरून टीम हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. ”कर्णधार केन विल्यमसनचे स्वागत. कोरोनामधून बरा होऊन आणि आयसोलेशन पूर्ण करून तो संघात परतला आहे. रविवारी तिसऱ्या कसोटीसाठी संघ लीड्सला रवाना होणार असून त्याआधी खेळाडूंना विश्रांती मिळणार आहे”, असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले.
Kane Williamson returns ????#ENGvNZ pic.twitter.com/4gZUGIrVZ2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2022
ट्रेंट ब्रिज कसोटीनंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय टीम फिजिओ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हेडिंग्ले येथे अंतिम कसोटी सामना २३ जूनपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

