🕒 1 min read
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून केतकी चितळे हे नाव सतत वादात आहे. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत केतकी चितळे हायकोर्टात दाखल झाली. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देखील दिले आहेत.
नेमकं काय आहे केतकी चितळे प्रकरण?
शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केलेली. यानंतर केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी १५ मे रोजी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात आले होते. यानंतर सत्र न्यायालयाने ३ दिवसांची म्हणजेच १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. राज्यात केतकीवर जवळपास २० ठिकाणी याच प्रकरणावर गुन्हे दाखल झाले आहेत.
आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत केतकीने हायकोर्टाकडे धाव घेतली आहे. केतकीने या प्रकरणाबाबत कोर्टामध्ये दुसरी याचिका देखील केली आहे. आता या प्रकरणामध्ये महिला आयोगानेही पाऊल उचललं आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
