नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल आज (३० मे) सोमवारी जाहीर झाला आहे. त्यात पुन्हा एकदा ‘गर्ल्स पाॅवर’ दिसून आली. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक घेतला आहे.
टॉप 10 मध्ये 4 मुलींचा समावेश आहे. दरम्यान श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असून जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये तिने UPSC परीक्षेची तयारी केली.
UPSC ची प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारीदरम्यान घेत त्याचा निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला. नंतर उमेदवारांची मुलाखत 26 मेपर्यंत चालली. दरम्यान टॉप 10 मध्ये श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल ,गामिनी सिंगला, ऐश्वर्य वर्मा, उत्कर्ष द्विवेदी, यक्ष चौधरी, सम्यक एस जैन, इशिता राठी, प्रीतम कुमार, हरकीरत सिंग रंधावा यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 Final : हार्दिक पंड्या होणार टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन? सुनील गावसकर म्हणाले, “त्याच्यात नेतृत्वगुण…”
- ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजना देणार अनाथ मुलांना आधार; पंतप्रधान मोदींची घोषणा
- “तुमची मॅजिक फिगर लोकांसमोर एकदा मांडाच” ; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान
- IPL 2022 : “त्याने आपली बॅट बॅगमध्ये भरून…” विराटच्या खराब कामगिरीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा सल्ला
- IPL 2022 Final : “मिस्टर पंड्या, आता कसं वाटतंय?”, ट्रॉफी जिंकल्यानंतर कोच नेहराचा हार्दिकला मजेशीर सवाल! पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

