Share

‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजना देणार अनाथ मुलांना आधार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजने अंतर्गत कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांद्वारे दर महिना ४ हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

“पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा तुम्हा सर्व कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने तुमच्या पाठीशी आहे. पीएम केयर्सच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न कोणत्याही एका व्यक्तीचा, संस्थेचा किंवा सरकारचा नाही. तर आपल्या कोट्यवधी देशवासीयांनी पीएम केअरमध्ये कष्टाचे पैसे आणि घामाचे पैसे जोडल्याचा आहे.”, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

“तुम्ही ज्या धैर्याने या संकटाचा सामना केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सलाम करतो. देशाच्या भावना तुमच्या पाठीशी आहेत. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. या संकटाच्या काळात माता भारती तुम्हा सर्व मुलांसोबत आहे. आज आपले सरकार 8 वर्षे पूर्ण करत असताना देशाचा आत्मविश्वास, देशवासीयांचा स्वतःवरचा विश्वास अभूतपूर्व आहे. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव आणि २०१४ पूर्वीचे दुष्टचक्र यातून देश आता बाहेर पडत आहे.”, असा टोलाही मोदींनी लगावला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!