Share

चिंताजनक! बारा जिल्ह्यांपैकी म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत

Published On: 

औरंगाबाद : कोरोनानंतर शहरात म्युकरमायकोसिस या भयंकर आजाराने हातपाय जोमाने पसरवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बारा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. बाधितांची संख्या आजघडीला एक हजारावर पोहचली आहे. तर आजवर या आजाराने ११७ जणांचा बळी घेतला आहे. सध्या २६२ सक्रीय रुग्णांवर शहरात उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनातून बरे झालेले सर्वाधिक रुग्ण म्युकरमायकोसिसचे शिकार होत आहेत. विशेष म्हणजे, इतर जिल्ह्यासह मराठवाडयातील इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी औरंगाबाद शहरात दाखल होत आहेत. म्युकरमायकोसिसच्या आजारावर उपचार करण्यासाठी दिर्घ कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

म्युकरमायकोसिसच्या आजाराची गांभिर्यता एप्रिलमध्येच दिसून आली. मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांनी त्रस्त नागरिकांना कोरोना उपचारादरम्यान रेमडेसिविर आणि स्टेराईड इंजेक्शन दिले असतील, तर त्यांना म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन स्तरावर नियोजन केले आहे. दरम्यान, म्यूकरमायकोसिसने मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. म्यूकरमायकोसिसचे रुग्ण शहरात कमी असले, तरी ग्रामीण व बाहेर जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. घाटी रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या असून त्यापाठोपाठ एमजीएम, एमआयटी, डॉ. हेडगेवार, बजाज, सिग्मा या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अडीचशे रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!