Share

धक्कादायक! आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये आढळला डास

Published On: 

औरंगाबाद : कोविडच्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीसाठी गेलेल्या नागरिकाला नमुना टाकण्यासाठी दिलेल्या बाटलीत असलेल्या द्रवामध्ये डास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारे चाचणी केल्याने वेगळे परिणाम अथवा दोष निघण्याची शक्यता सदर नागरिकाने व्यक्ती केली. हा प्रकार महापालिकेच्या एन-२ सिडको कम्युनिटी हॉल येथील चाचणी केंद्रावर गुरुवारी (दि.१७) घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

सिडको एन-३ येथील अभ्यासिका चालवणारे अक्षय गोयल हे एन-२ कम्युनिटी हॉल सिडको येथे आरटीपीसीआर चाचणीसाठी गेले होते. त्यामुळे नमुना जतन करण्यासाठी असलेली टेस्ट ट्यूबची प्लास्टिकची बाटली त्यांना दिली. या बाटलीतील पिवळ्या द्रवात त्यांना डास दिसून आला. हा प्रकार पाहून गोयल यांनी आरोग्य सेवकाला सांगितले. सेवकाने हि बाटली चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली.

यावर गोयल यांनी सांगितले की नाकातील लाळ जतन करण्यासाठी या बाटल्या दिल्या जातात. परंतु यात डास निघणे हे धोक्याचे आहे. माझ्यासोबत हा प्रकार घडला मी वेळीच लक्ष दिले म्हणून ठीक आहे. परंतु प्रत्येकाचे याकडे लक्ष जाईलच असे नाही. इतरांसोबत असे प्रकार घडल्यास तसेच याकडे लक्ष न गेल्यास चाचणीमध्ये दोष आढळून येऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!