Share

विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीत प्राथमिक शाळा सुरु करण्याची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या सावटात मागील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांकरिता शाळा बंद राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने अत्यंत नाईलाजास्तव शाळा बंद ठेवल्या असल्या तरी याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा लक्षात घेता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरीता प्राथमिकच्या शाळा विद्याथ्र्यांच्या नियमित उपस्थितींसह सुरू करा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षणाधिका-यामार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.

शासनाने ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पर्यायी माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांनीही यासंबंधाने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याकरीता प्रयत्न केले. मात्र ऑनलाईन शिक्षण हे त्यातील मर्यादा व विविध प्रकारची अनुलब्धता लक्षात घेता नियमित औपचारिक शिक्षणास पर्याय ठरूच शकत नाही. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकले नाही. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः थांबल्याचे वास्तव आहे.

२०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात पाहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि शिक्षकही पाहिलेले नाहीत ही सत्यस्थिती आहे. प्राथमिकच्या वर्गातील बहुतांश विद्यार्थी भाषिक आणि गणितीय मूलभूत शैक्षणिक पायाच विसरले आहेत. अशा स्थितीत आता प्रत्यक्ष विद्याथ्र्यांच्या उपस्थितीत नियमित शाळा सुरु करण्याशिवाय तरणोपाय नाही, असेही समितीने स्पष्ट करत विविध मागण्या प्राथमिक शिक्षक समितीने केल्या असल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!