Share

वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही – पंकजा मुंडे

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे २६ आणि २७ जून रोजी दोन दिवसीय चिंतन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात राज्यातील २५० प्रतिनिधी सहभागी होतील आणि त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. या चिंतन बैठकीला सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली होते.

मात्र आता पंकजा मुंडे यांनी आपण वडेट्टीवारांच्या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आम्ही ओबीसींच्या हक्कांसाठी काहीही करायला तयार आहोत. पक्ष आणि राजकारणाचा विषयच येत नाही. मात्र, 26 तारखेला चक्काजाम आंदोलन असल्याने मी आंदोलनात असेल. त्यामुळे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही’, असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!