Share

चिंताजनक! सारीतून कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले

Published On: 

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वीच एकाच दिवसांत सारीचे ३० बाधित शहरात आढळले होते. गुरूवारी (दि.२३) सारीचे तब्बल २२ रुग्ण आढळून आले. या सर्वांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातून १३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे आता शहरात कोरोनासोबतच सारीबाधितांचीही संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

कोरोनासोबतच मार्च २०२० पासून शहरात सारीने शिरकाव केला आहे. या आजाराचे नित्याने बाधित आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने या आजारावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सारी हा कोरोनासारखा संसर्गजन्य आजार नाही. शिवाय, वयस्क लोकांमध्येच सारीचे प्रमाण अधिक आढळून येते. मात्र या आजाराची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने शासन निर्देशानुसार प्रत्येक सारीच्या रुग्णाची कोरोना चाचणी केली जात असून रोजचा अहवाल खासगी रुग्णालयांकडून महापालिकेला पाठवला जात आहे.

दरम्यान, मागील आठवडाभरापासून शहरात कोरोना बाधितांची रोजची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र सारी आजाराचे आजवर ज्याप्रमाणे रुग्ण आढळत आहेत, ते प्रमाण आजही कायम आहे. दरम्यान, सोमवारी (दि.१९ ) सारीचे एकदमच ३० बाधित आढळले होते. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातून २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर मंगळवारी सहा तर बुधवारी एकही बाधित निघाला नाही.

मात्र गुरूवारी (दि.२२) पुन्हा सारीचे २२ बाधित आढळून आले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातून १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार, आजवर शहरात सारीचे एकूण २९४२ बाधित आढळले आहेत. पैकी २९३३ जणांच्या चाचणीतून १०६५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर १७ सारी बाधितांचा आजवर मृत्यू झालेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!