Share

कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह

Published On: 

काठमांडू : जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावरही पोहोचला आहे. हे शिखर सर करण्यासाठी निघालेल्या एका गिर्यारोहकाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्याला अर्ध्या मोहिमेतूनच रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

अर्लेंड नेस असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. पण, दुर्दैवाने मोहिमेच्या ६ व्या दिवशीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना हा संसर्ग कुठे व कसा झाला याची कोणतीच माहिती नाही. पण, त्यांनी आपण एकेठिकाणी चहा घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना तिथेच संक्रमण झाल्याचा संशय आहे. त्यांना गत १५ तारखेला हेलिकॉप्टरने बेस शिबिरात आणण्यात आले. त्यांच्यावर येथील २ रुग्णालयांत उपचार करण्यात आले. त्यात त्यांची ३ वेळा चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर गुरुवारी त्यांचा अहवाल नकारात्मक आला.

सध्या ते आपल्या येथील मित्रांसमवेत राहत आहेत. नेस यांच्या गटातील एक ‘शेर्पा’ ही पॉझिटिव्ह आढळला आहे. ‘उंच पर्वतावर आणखी कुणीही संक्रमित होणार नाही अशी आशा आहे. गिर्यारोहक ८ हजार मीटरहून अधिक उंचीवर असताना त्यांना हेलिकॉप्टरने खाली आणणे अत्यंत जिकिरीचे काम असते’, असे नेस यांनी म्हटले आहे. काठमांडूच्या ‘सीआयडब्ल्यूईसी’ रुग्णालयाने माउंट एव्हरेस्टवरून रुग्ण दाखल झाल्याची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!