लातूर: रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते, तसेच तेथील यंत्रणा सामुग्री हातळणारी यंत्रणा नसल्याने एकाच मृत्यू देखील झाला आहे तसेच अनेक रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचेही समोर आले आहे. मात्र आता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी शुक्रवारी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला व तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २० बेडची व्यवस्था करण्यात आली असली तरी नियोजन व यंत्रसामुग्रीअभावी तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. याचे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांच्या आदेशानुसार येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी २० बेडचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. मात्र रुग्णालयात नियोजनाचा अभाव व पुरेशी यंत्रसामुग्री नसल्यामुळे कोरोना बाधित रुग्णाचा जीव धोक्यात येत आहे. येथील रुग्ण व नातेवाईक यांच्या तक्रारीवरून डॉ. श्रीधर पाठक यांनी शुक्रवारी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. रुग्णाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह सूचना देत पुन्हा तक्रारी आल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !
- उसाची एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होण्याची शक्यता, निती आयोगाची शिफारस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

